नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांच्या राजीनाम्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

Foto
गंगापूर, (प्रतिनिधी) : गंगापूर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई करून त्यांना निलंबित करण्याची मागणी नगरसेविका सुवर्णा संजय जाधव यांनी जिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

२२ तक्रारीनुसार, जुलै २०२६ रोजी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त शासनाच्या आदेशानुसार सर्व शासकीय कार्यालयांमध्ये कार्यक्रम आयोजित करणे अपेक्षित होते. मात्र, गंगापूर नगरपरिषदेत मुख्याधिकारी संतोष आगळे यांनी कार्यक्रम आयोजित करण्यास दिरंगाई केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

नगरसेविका सुवर्णा जाधव यांनी निवेदनात म्हटले आहे की, त्या स्वतः गंगापूर नगर परिषदेत जाऊन कार्यक्रमाचे
नियोजन करत असताना मुख्याधिकारी उशिरा आले. त्यानंतर त्यांनी उद्धट भाषेत उत्तर देऊन तेथून निघून गेल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी करून मुख्याधिकारी संतोष आगळे यांच्यावर तातडीने कारवाई शिस्तभंगाची करून निलंबित करावे, अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

शासनाच्या आदेशांचे पालन करणे प्रत्येक अधिकाऱ्याचे कर्तव्य आहे. जयंती कार्यक्रमाबाबत झालेली दिरंगाई आणि माझ्याशी झालेली वागणूक अत्यंत खेदजनक आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई व्हावी, अशी माझी मागणी आहे.

- सुवर्णा जाधव, नगरसेविका, गंगापूर